पावसाचा जोर ओसरताच मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत तापमानात वाढ


विशेष प्रतिनिधी

मुंबई – पावसाचा जोर ओसरला असून, राज्याच्या बहुतांश भागांत दिवसभर निरभ्र आकाशदर्शन होत आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून, नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मुंबई शहराच्या कमाल तापमानाची वाटचाल आता ३५ अंश सेल्सिअसकडे सुरू झाली आहे.Temp rises in all over maharashtra

शहरात गेल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाचा जोर नसला तरी वातावरणात गारवा तयार झाला होता. शनिवार आणि रविवारी मुंबईतील कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. त्यात आता चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ होऊन ते ३५ अंश सेल्सिअसकडे झेपावताना दिसते. हवेतील आर्द्रतेमध्येही वाढ झाली आहे. कुलाबा ८८ टक्के, तर सांताक्रुझ ८६ टक्के आर्द्रतेची नोंद झाली आहे.गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील वातावरणात बदल झाले आहेत. सांताक्रुझ येथील केंद्रांवर ३३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस होते. पाऊस थांबल्याने आकाश निरभ्र झाले. त्यामुळे वातावरणातील उष्मा वाढत आहे.

Temp rises in all over maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण