प्रतिनिधी
पुणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात शरद पवारांसमोर रडल्या होत्या. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आपल्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका करत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार विधानसभेत शांत बसून राहिले याविषयी त्यांनी पवारांसमोर रडून तक्रार केली होती.Sushma Andhare cried in his party instead of crying in front of Mr. Pawar; Ajitdad’s gang
https://youtu.be/pXimLZ5xqcc
त्या मुद्द्यावरून आता अजितदादांनी सुषमा अंधारे यांना परखड शब्दांत सुनावले आहे. पुण्यामध्ये पत्रकारांनी सुषमा अंधारे यांच्या संदर्भातला प्रश्न अजित दादांना विचारल्यानंतर ते म्हणाले, सुषमा अंधारे कोणत्या पक्षात आहेत?, शिवसेनेच्या ठाकरे गटात ना. मग त्यांनी पवार साहेबांसमोर रडण्यापेक्षा आणि माझ्या बद्दल तक्रार करण्यापेक्षा शिवसेनेच्या ठाकरे गटातल्या नेत्यांसमोर रडावे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते आहेत. विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याला असणारे अधिकार आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याला असलेले अधिकार समान आहेत. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी त्यांच्याकडे जाऊन रडावे, असा टोला अजित दादांनी सुषमा अंधारे यांना लगावला.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे अनेक नेते आपल्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करतात, अशी तक्रार सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांच्यासमोर केली होती. पण त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांना प्रत्युत्तर देत नाही तर ते गप्प बसतात, असा आरोपही त्यांनी पवारांसमोर रडून केला होता. या मुद्द्यावर आज अजित पवारांनी पुण्यात पत्रकारांची बोलताना सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App