प्रतिनिधी
बारामती : तुळजापुरातलं नवसाच मुख्यमंत्रिपद पुण्यात येता येता ताटातलं वाटीत आलं!! तुळजापुरात भवानी मातेचे दर्शन घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र चांगले दिवस येऊ दे. बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस पडू दे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे. सगळ्या पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असा नवस बोलल्याच्या बातम्या आल्या होत्या. supriya sule syas about chief minister of maharashtra
पण आता तुळजापुरात नवसाचे बोललेले मुख्यमंत्रिपद पुण्यात येता येता आल्यानंतर ताटातलं वाटीत आला आहे!!
सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पदाबाबत खुलासा केला आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आहे. हे वास्तव आहे. महाविकास आघाडी जनतेची सेवा करण्यासाठी एकत्र आली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना आपलाच मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. पण ही महाविकास आघाडी आहे. त्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असंच आहे!! आम्ही तिघे मिळून एकत्र येऊन जनतेची सेवा करत आहोत, असे वक्तव्य केले.
त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री पदावर बाबतचा प्रश्न विचारणार्या पत्रकाराला मी नवस बोलल्याचे तुम्ही प्रत्यक्ष ऐकले आहे का?, असा सवाल करून बुचकळ्यात टाकले. मात्र नवस बोलल्याच्या बातम्या आल्याचे संबंधित पत्रकाराने सांगताच सुप्रिया सुळे यांनी ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, असे सांगून महाविकास आघाडी एकच असल्याचे स्पष्ट केले. परंतु त्यांच्या वक्तव्यामुळे तुळजापुरात नवसाचा बोललेले मुख्यमंत्रिपद पुण्यात येताच मात्र ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात येऊन ठेपल्याचे स्पष्ट झालं!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App