विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: राष्ट्रवादीच्या खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे घराणेशाहीच्या आरोपावर लोकसभेतच चिडल्या. आई-बाप काढायचे काम नाही, असा इशारा त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिला.लेकसभेत बोलताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही आज लोकसभेत पोहोचला आहात.Supriya Sule angry over dynastic allegations, tells Union Minister not to name parents
तुम्हाला इथे बोलता येईल यासाठी त्यांनीच तुम्हाला लायक बनवले आहे. जितेंद्र सिंह यांच्या या वक्त्यावर सुप्रिया सुळे चांगल्याच चिडल्या. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनलेला तुम्हाला चालतो, मग आमची तुम्हाला काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी जितेंद्र सिंह यांना केला. त्या म्हणाल्या माझ्या आई-वडिलांचा मला अभिमानच आहे; पण इथे आई-बाप काढू नका.
लोकसभेत महागाई आणि काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मीरच्या पंडितांसाठी काय तरतूद केली, असा सवाल केंद्र सरकारला केला. त्यावर उत्तर देण्यासाठी उभे राहिलेल्या केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबतही त्यांची चांगलीच खडाजंगी झाली.
सुळे म्हणाल्या, काश्मीर हे आमच्यासाठी नेहमीच एक सुंदर ठिकाण राहिले आहे. लहान असतानाही आई-वडिलांसोबत मी जम्मू-काश्मीरला वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जात असत. गेली 70 वर्षे जम्मू-काश्मीरसाठी काय केले, असा प्रचार भाजपकडून नेहमी केला जातो. मात्र, किती काळ भुतकाळात जगणार. तुम्ही किती रोड, शाळा बांधल्या?
वेदांमध्येही भुतकाळाला विसरा आणि वर्तमानात जगा, भविष्याचा विचार करा. तुम्ही वेद तरी वाचा. काश्मिरी पंडितांसाठी कळवळा दाखवतात, मात्र अर्थसंकल्पात तुम्ही त्यांच्यासाठी काय तरतूद केली? जम्मू-काश्मिरमध्ये एका काश्मिरी पंडित कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कुल’ या शाळेची माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की,
या शाळेत सध्या 5 हजार विद्यार्थी शिकत आहे. तिथे विशेष मुलांसाठी सुविधा करण्यात आली आहे. सरकारलाही हे काम अद्याप जमलेले नाही. अशा स्थितीत या शाळेला मदत करण्याऐवजी सरकारकडून मात्र या शाळेला नोटीसांवर नोटीसा पाठवल्या जात आहेत. फी स्ट्रक्चर, सोईसुविधा आदींबाबत प्रश्न विचारले जात आहे. हेच का तुमचे काश्मिरी पंडितांसाठीचे प्रेम.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App