विशेष प्रतिनिधी
मुंबई : एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या रडारवर असल्याचंच चित्र दिसत आहे. नवाब मलिक सतत ट्विटरवरून समीर वानखेडेना टार्गेट करत आहेत. त्यांनी आज केलेल्या ट्विट नंतर मात्र अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
नवाब मलिक या ट्विटनंतर ट्रोल होतायेत. एका खात्याच्या मंत्र्याला हे शोभतं का ? तर मंत्री साहेबांना सरकारी काही काम नाही का ?असे सवालही काहींनी विचारले आहेत.
देश का एक मंत्री का स्तर देखिए ……जिसपर पवार से लेकर शवसेना…को..मराठी अस्मिता की कोई चिंता नही क्या पत्नी पिता बच्चों को टारगेट करके ये सब होना चाहिए आप सब समझदार है…….. — Yogendra Singh (@BhadoYogendra) October 25, 2021
देश का एक मंत्री का स्तर देखिए ……जिसपर पवार से लेकर शवसेना…को..मराठी अस्मिता की कोई चिंता नही क्या पत्नी पिता बच्चों को टारगेट करके ये सब होना चाहिए आप सब समझदार है……..
— Yogendra Singh (@BhadoYogendra) October 25, 2021
क्रूझशिप ड्रग्ज पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आहेत.
https://twitter.com/Krishna55903727/status/1452497100814516224?s=20
जहाजावर टाकलेल्या धाडीवरून आणि आर्यन खान अटकेवरून विविध प्रश्न उपस्थित केले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कारवाई मागील भूमिकेवर शंका उपस्थित करत आरोप केले आहेत.
नवाब मलिक यांनी सोमवारी आणखी एक ट्वीट करत एक बृहन्मुंबई महापालिका असं नाव असलेला कागद शेअर केला आहे.
हा कागद समीर वानखेडे यांचं जन्मप्रमाणपत्र असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यावरून आता मलिकांनी वानखेडेंना लक्ष्य केलं आहे. समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून, अनुसूचित जाती अर्थात एससी (SC) प्रवर्गातून त्यांची निवड झालेली आहे.
मलिकांना समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करायचा असेल. समीर वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र तयार केलं, याकडेही त्यांना लक्ष्य वेधायचं असेल. मात्र यामागचं नेमकं कारण मलिकांनी भाष्य केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App