AURANGABAD: क्या बात है! दिल्लीत नव्या संसदेतील राजमुद्रा उभारणीत औरंगाबादचा हात ! टाटांनी केली शिल्पकार सुनील देवरेंची निवड…


वेरुळ व अजिंठा येथील अभ्यागत कक्षातील मूर्तिकाम करणाऱ्या सुनील देवरे यांचा शोध टाटा प्रोजेक्टकडून घेण्यात आला.Sunil Deore, a sculptor in the visitors’ room at Ellora and Ajanta, was traced by the Tata Project.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : दिल्लीत संसदेच्या इमारतीमधील भव्य अशोकस्तंभावरील ‘राजमुद्रा’ घडविण्याचे काम करण्यासाठी औरंगाबाद येथील शिल्पकार सुनील देवरे यांची निवड करण्यात आली आहे.’देशाच्या संसदेवर उभ्या होणाऱ्या राजमुद्रेला आपला हात लागतो आहे, याचा अभिमान वाटतो,’ असे कलाकार सुनील देवरे यांनी सांगितले.

टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने या कामासाठी देवरे यांची निवड केली असून गेल्या चार महिन्यापासून ते या कामासाठी आवश्यक तो तपशील बारकाईने अभ्यासत आहेत. रतन टाटा यांनीही देवरे यांच्या निवडीबाबत पसंती व्यक्त केली आहे.

वेरुळ व अजिंठा येथील अभ्यागत कक्षातील मूर्तिकाम करणाऱ्या सुनील देवरे यांचा शोध टाटा प्रोजेक्टकडून घेण्यात आला.दिल्ली येथे ६४ हजार ५०० चौरस मीटरवर संसदेची नवी इमारत होत आहे. त्याचा खर्चही अलीकडेच ९७७ कोटी वरून १२५० कोटींपर्यंत वाढेल असे सांगण्यात येत आहे.

४० टक्क्यांहून अधिक काम आता पूर्ण होत आले असल्याने पहिल्या टप्प्यातील कामात अशोकस्तंभाची मुद्रा उभारण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे.

चार महिन्यांत संसदेच्या नव्या इमारतीवर २१ फूट उंचीची तांब्याच्या धातूतील मुद्रा बसविण्यात येणार आहे.पायासह ही उंची ३० फूट असणार आहे. त्याचे मातीशी संबंधित कामही आता पूर्ण झाले आहे. एप्रिल- मे मध्ये ते पूर्णत्वास येईल.

Sunil Deore, a sculptor in the visitors’ room at Ellora and Ajanta, was traced by the Tata Project.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!