विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन किंवा रात्रीच्या संचारबंदीसारखे कठोर निर्णय घ्यावे लागले तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माथी मारण्याचा महाविकास आघाडीचा डाव आहे. त्यामुळे पंतप्रधानांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतरच निर्णय घेण्याची भूमिका मुख्यमंंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे.Stricter sanctions or not in CM’s court
राज्याचे मुख्य सचिव देबशीष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या मॅरेथॉन बैठकीत राज्यभरातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. मुंबई महानगरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी सारख्या कठोर उपाययोजनांची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे निर्बंधांचा प्रस्तावही पाठविण्यातही आला होता. मात्र, लॉकडाऊन किंवा निबंर्धांबाबत राष्ट्रीय पातळीवर निकष असायला हवेत, अशी भूमिका राज्याची आहे. त्यामुळे अगदी विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही पंतप्रधानांसोबतच्या चर्चेनंतर अथवा केंद्राकडून स्पष्टता आल्यानंतर घेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
मुख्य सचिव देवशीष चक्रवती यांनी राज्यातील विविध भागांतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. सध्या मुंबई महानगर परिसरातच मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या आढळून आली आहे. सर्वाधिक लसीकरण याच भागात झाल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे.
त्यामुळे राज्याच्या इतर भागात विशेषत: ग्रामीण भागातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. तसेच, पुन्हा एकदा ब्रेक द चेननुसार निर्बंध लावण्याची तयारी सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App