नवी मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, सत्ताधाऱ्यांबरोबर फरफटत जाणार नसल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली घोषणा


नवी मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यां सोबत फरफटत जाणार नाही अशा कानपिचक्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला देत कॉँग्रेस स्वबळावर महापालिका निवडणुका लढविणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. State President Nana Patole announces that Congress’s slogan of self-reliance in Navi Mumbai


प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांसोबत फरफटत जाणार नाही अशा कानपिचक्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला देत कॉँग्रेस स्वबळावर महापालिका निवडणुका लढविणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पटोले यांनी नवी मुंबईत काँग्रेस भवनाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अंतर्गत मतभेद मिटवता आले नाहीत तर दुसऱ्याला संधी दिली जाईल. पक्ष एकट्याचा नसतो तर त्याची विचारधारा मानणाऱ्या सर्वांचा असतो. नवी मुंबई काँग्रेस सत्ताधारी पार्टीबरोबर फरफटत जाणार नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून केंद्रीय नेतृत्वाकडे अहवाल पाठवावा लागतो.


स्वबळाचा नारा देत नाना पटोले यांचे शिवसेनेला टोले; म्हणाले, ‘सामना’ वाचणे बंद!


मात्र मी चार महिन्यात अहवाल पाठवला नाही. शहरात विविध कार्यक्रम घेतले जातात, त्याचे फोटो काढून अहवाल तयार केले जातात. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीत तुमच्या कामांचा रिझल्ट दिसणे गरजेचे आहे.

नवी मुंबईत काँग्रेस अंतर्गत वाद मिटवावे आणि ते मिटवता येत नसेल तर दुसऱ्याला संधी दिली जाईल असा इशारा देत पटोले म्हणाले, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांच्यापेक्षा चांगला व्यक्ती भेटला तर त्याला संधी देण्यात येईल. लोकांची कामे करा कोणाच्या घरात दु:खद घटना घडली तर त्याच्या घरी जाऊन भेट घ्या, सांत्वन करा.

नवी मुंबई हे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या कल्पनेतून उतरली असून त्यांच्या तो उद्देश्य साध्य करण्यासाठी काँग्रेस सत्तेत असणे गरजेचे आहे असं नाना पटोलेंनी सांगितलं.

State President Nana Patole announces that Congress’s slogan of self-reliance in Navi Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी