कुपोषण संपवण्यासाठी राज्य सरकारची अनोखी मोहीम; अन्नाचा दर्जा तपासणाऱ्या ‘AI’ यंत्राचं लोकार्पण

AI Machin

 जाणून घ्या, गडचिरोलीतील तोडसा आश्रमशाळेत बसवण्यात आलेलं हे यंत्र नेमकं कसं काम करतं?

विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : तंत्रज्ञानाच्या बाबतीत देश दिवसेंदिवस नवनवीन टप्पे गाठत आहे. याचे उदाहरण महाराष्ट्रातील गडचिरोली येथे पाहायला मिळाले. इथे एका शाळेत असं यंत्र ज्यास आर्टिफिशयल इंटेलिजन्स म्हटलं जात ते बसवण्यात आलं आहे. याच्या वापराने अन्नपदार्थांचा दर्जा तपासला जाऊ शकतो. आदिवासी मुलांची पोषण पातळी सुधारणे हे यंत्र बनवण्यामागचा उद्देश आहे. State Governments Unique Campaign to End Malnutrition Launch of AI machine that checks food quality

गडचिरोलीतील एटापल्ली येथील तोडसा आश्रमशाळेत हे यंत्र बसवण्यात आले आहे. हे यंत्र जेवणाच्या थाळीचे तसेच विद्यार्थ्यांचे छायाचित्र काढते आणि काही सेकंद घेतल्यानंतर हे मशीन अन्नाचा दर्जा चांगला आहे की नाही हे सांगते. कुपोषण दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आदिवासी भागात राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये अभ्यासाबरोबरच पौष्टिक आहाराकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.

आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या या अभियानात स्वयंसेवी संस्थाही मदत करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्योग यंत्र स्टार्ट अपच्या मदतीने तोडसा आश्रमशाळेत हे अन्नाचा दर्जा तपासणारे यंत्र बसविण्यात आले आहे. यंत्र गुणवत्तेबरोबरच प्रमाणावरही विशेष लक्ष देते.

यंत्र कसे काम करते –

मशीनची काम करण्याची पद्धत देखील अद्वितीय आहे. विद्यार्थी प्रथम मशिनसमोर उभा राहतो आणि आपले जेवणाचे ताट मशीनवर ठेवतो. जेवणासोबत हे यंत्र विद्यार्थ्याच्या ताटाचे छायाचित्रही घेते आणि काही सेकंदातच त्याचा निकाल सांगतो की, विद्यार्थ्यानुसार जेवणाचा दर्जा चांगला आहे की नाही.

State Governments Unique Campaign to End Malnutrition Launch of AI machine that checks food quality

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात