विशेष प्रतिनिधी
मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी संप ताणून धरल्याने एसटीची सार्वजनिक प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन करूनही कर्मचारी हजर होत नसल्याने अखेर सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्ती आणि खासगी चालकांना कंत्राटी पद्धतीने एसटीच्या ताफ्यात घेण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला असून, ४०० खासगी चालक नियुक्तीसाठी चार संस्थांची निवड करण्यात आली आहे. ST started recruitment process
एसटी प्रशासनाकडे सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेल्या ६२ वर्षे अपूर्ण असलेल्या एसटीच्या माजी कर्मचाऱ्यांचे अर्ज एसटी प्रशासनाकडे करण्यास सुरुवात झाली आहे; तर प्रत्येकी १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी चार संस्थांची नियुक्ती करण्यात आल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.
एसटीची सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून हा प्रयत्न केला जात आहे. संपकरी विलीनीकरणावर ठाम असल्याने या कंत्राटी एसटी चालकांना प्रशासनाकडून सेवेत वापरत प्रवासी सेवा पूर्ववत करता येणार असून, सर्वसामान्य प्रवाशांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App