‘एसटी कर्मचाऱ्यांनी संमजसपणे भूमिका घ्यावी, टोकाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नये ‘ ; अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

  • एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, उद्या जर मेस्मा कायद्यासंदर्भात (अत्यावश्यक सेवा कायदा ) निर्णय घेतला तर? असा सवाल अजित पवारांनी केला आहे. ‘ST employees should act sensibly, not allow time to come to an end’; Ajit Pawar’s warning to ST employees

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे मागील काही दिवसांपासून विलीणीकरणाच्या मागणी संप चालू आहे.संपातून तोडगा काढण्यासाठी आणि एसटी सेवा पुन्हा सुरळीत चालू करण्यासाठी परिवहन मंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली. तरीसुद्धा राज्यातील एसटी कर्मचारी एसटीचा संप मागे घेण्यास तयार नसून ते विलीणीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की , परिवहन मंत्री अनिल परब यांनी आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक गोष्टीत अनेकदा मूभा दिली. तरीसुद्धा एसटी कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.दरम्यान आता एसटी कर्मचाऱ्यांनी आमची सहनशीलता संपवली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, उद्या जर मेस्मा कायद्यासंदर्भात (अत्यावश्यक सेवा कायदा ) निर्णय घेतला तर? असा सवाल अजित पवारांनी केला आहे.



अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की , आता एसटी कर्मचाऱ्यांनी येऊन पुन्हा कामास सुरुवात केली पाहिजे.पुढे अजित पवारांनी असा सवाल केला आहे की, एसटी चालवताना काही कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली जाते. एसटीचे नुकसान झाले तर ते जनतेचच नुकसान आहे. त्यातून कोणाला काय मिळतं? एसटी कर्मचाऱ्यांचे मानधन बऱ्यापैकी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी संमजसपणे भूमिका घ्यावी. आपण महाराष्ट्रातील एका परिवारातील आहोत, असेही पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले, उद्या मेस्मा कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला तर मागच्या काळामध्ये काय अवस्था झाली हे आपण बघितले. जर कुणी ऐकायला तयार नसेल आणि नविन भरती सुरु केली तर नोकरीचा प्रश्न येणार आहे. याबद्दल पण मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. इथपर्यंत टोकाची वेळ येऊ नये अशी माझी एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे.

‘ST employees should act sensibly, not allow time to come to an end’; Ajit Pawar’s warning to ST employees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात