प्रतिनिधी
पुणे : पुण्यात कोयता गँगने ची दहशत माजवली असताना सर्वसामान्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोयता गँगचा बिमोड करण्याचे पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. अशा वेळी पुणे पोलिस आता या गँगच्या विरोधात सक्रिय झाले आहे. त्यांनी विशेष पथक नेमले आहे. Special team of Pune Police active against Koyta Gang
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना घडू नये यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली.
कोयता टोळ्यांना कोयते पुरवणारा दुकानदार हुसेन राजगराला पुण्यातून अटक; 105 कोयते जप्त
पुण्यातील एसआरपीएफ ग्रुप, रामटेकडी येथे ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गॅंगने दहशत माजवल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली असली तरी अद्याप ही हातात कोयते घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच काम काही जण करत आहेत. पोलीसांचे विशेष पथक त्यांना वठणीवर आणेल, असे पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App