मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षे शिवसेना युतीत सडली, अशी भाजपवर सडकून टीका केली होती. यावर आज माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, युतीचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला, त्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करता? असा सवालही फडणवीसांनी केलाय. Sonia Gandhi, Rahul Gandhi did not even tweet a simple Tribute to Balasaheb, still sitting With Them, Devendra Fadnavis criticizes uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षे शिवसेना युतीत सडली, अशी भाजपवर सडकून टीका केली होती. यावर आज माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, युतीचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला, त्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करता? असा सवालही फडणवीसांनी केलाय.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१२ पर्यंत बाळासाहेब ठाकरे हे युतीचे नेते होते. त्यांच्या युतीच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवताय? बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुम्ही म्हणताय का? काल 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. त्यानिमित्त जवळपास सर्वच भाजप नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटद्वारे किंवा प्रत्यक्षपणे आदरांजली वाहिली. पण काँग्रेसकडून असं ट्वीट कधी झालंय का, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.
LIVE | Media interaction from #Mumbai. #Maharashtra https://t.co/u1MEjxtzEP — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 24, 2022
LIVE | Media interaction from #Mumbai. #Maharashtra https://t.co/u1MEjxtzEP
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 24, 2022
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींपासून शहा आणि फडणवीसांपर्यंत सर्वांनी ट्विटरवरून अभिवादन केलं. पण सोनिया गांधी, प्रियांका आणि राहुल गांधींनी अभिवादनाचं ट्विटही केलं नाही. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केलं नाही, हे लक्षात आणून देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो, त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही? ज्यांना बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता?, अशी टीकाही त्यांनी केली.
फडणवीस पुढे म्हणाले, “भाजपसोबत लढलो असं सांगताना हे भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले, याचा निर्णयही त्यांनी केला पाहिजे. कुणाकडे सडले. तेच तेच मुद्दे असतात. कदाचित शिवसैनिकांनाही तेच तेच भाषण पाठ झालं. तुमची सिलेक्टिव्ह विसरण्याची पद्धत आहे. तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते. 1984 मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
ते पुढे म्हणाले की, राम जन्मभूमीच्या आंदोलनात कोण होते तुमचे? लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दवडली. कोण होते तुम्ही. राम मंदिर-बाबरी सोडून द्या. मोदींनी करून दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात तयार होत आहे राम मंदिर. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय, असा सवाल त्यांनी केला. आनंद दिघेंनी संघर्ष केला. तुमचा मुख्यमंत्री असताना तुम्ही मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. आताही सोडवत नाही. तुमचं हिंदुत्व कागदावर आहे!, अशी टीकाही फडणवीसांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App