शास्त्रीय संगीतासाठी नवीन पिढीचे’ कान ‘ तयार करावे – शरद पवार

शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा १३ वा राम कदम कलागौरव पुरस्कार पदमश्री गायक शंकर महादेवन , गायक राहुल देशपांडे , यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


विशेष प्रतिनिधी

पुणे : शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी नवीन पिढीला प्रोत्साहित करुन त्याचे ‘ कान ‘ तयार केले पाहिजे असे मत राष्टवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषी मंञी शरद पवार यांनी व्यक्त केले. Singar Shankar Mahadevan & Rahul Deshpande Awarded Ram kadam kalagaurav puraskar

शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा १३ वा राम कदम कलागौरव पुरस्कार पदमश्री गायक शंकर महादेवन , गायक राहुल देशपांडे , यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील , उघोजक विठठल मणियार, सुहाना मसाले विशाल चोरडिया उपस्थित होते.

कला क्षेञाबददल आस्था आहे असे सांगुन शरद पवार म्हणाले , संगीतकार राम कदम हे मिरजेचे होते. पुवीे सातारा आणि सांगली हे एक जिल्हा होता. राम कदम, गदिमा हे दुष्काळी आणि लहान गावातुन आले. कला आणि साहित्य क्षेञात नाव कमावले. गीतरामायण रेडिओवर लागले की पुण्यातील रस्त्यावर चीटपाखरु नव्हते अशी आठवण त्यांनी सांगितली.

गायक शंकर महादेवन यांनी ‘सुर निरागस हो ‘ या सादर केलेल्या गीताला पुणेकरांनी टाळ्याच्या गजरात दाद दिली.
प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांनी प्रास्ताविक केले . या सोहळ्यापुवीे कै. राम कदम यांनी संगीत दिलेली गीते सादर करण्यात आली . गायक राहुल देशपांडे यांचेही भाषण झाले .

पदमविभुषण, पदमश्री आणि श्री शरद पवार यांना पदमविभुषण , शंकर महादेवन यांना पदमश्री आणि मी नुसता श्री असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगताच टाळ्याचा कडकडाट झाला.

Singar Shankar Mahadevan & Rahul Deshpande Awarded Ram kadam kalagaurav puraskar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात