Suicide of 1076 farmers in the last 5 months : सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी विविध मुद्द्यांवर ठाकरे सरकारला घेरले आहे. अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्यांविषयी धक्कादायक आकडेवारी सादर केली. Shocking Suicide of 1076 farmers in the last 5 months in the state, information of the state government in the House
प्रतिनिधी
मुंबई : सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी विविध मुद्द्यांवर ठाकरे सरकारला घेरले आहे. अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्यांविषयी धक्कादायक आकडेवारी सादर केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, यापैकी 491 प्रकरणे ही जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवली आहेत. शिवाय त्यांना आर्थिक मदतही दिली जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं ते म्हणाले. आर्थिक मदत आणि आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर वडेट्टीवारांनी हे उत्तर दिले.
वडेट्टीवार म्हणाले की, ‘जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांमधून जिल्हास्तरीय समितीने 491 पात्र ठरवल्या. तर 213 आत्महत्या अपात्र ठरवल्या. तर 372 प्रकरणे ही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र असलेल्या 491 पैकी 482 जणांना मदतही दिली असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
https://youtu.be/qocTt1ubNfI
Shocking Suicide of 1076 farmers in the last 5 months in the state, information of the state government in the House
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App