विशेष प्रतिनिधी
पुणे : वानवाडी गँगरेप प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून पीडित अल्पवयीन मुलीवर एकूण 13 जणांनी बलात्कार केला आहे. नराधमांनी तिच्यावर अनैसर्गिक संभोगही केल्याचे उघड झाले आहे.Shocking information in Wanwadi gangrape, minor girl raped by 13 people
31 ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पीडित मुलगी पुणे स्टेशन येथे आली होती. मात्र, रात्री उशिरा गाडी नसल्यामुळे राहण्याची व्यवस्था करतो, असं सांगून रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेतले. वानवडी येथे नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. सुरुवातील सहा रिक्षाचालक आणि दोन रेल्वे कर्मचाºयांनी या पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली होती.
पण, पोलीस तपासातून संतापजनक माहिती समोर आली. वानवडी पोलिसांनी आणखी 6 जणांना अटक केली आहे. यापैकी 5 जणांनी बलात्कार केला होता. एकूण तेरा जणांनी पीडितेवर अत्याचार केला आहे. मुलीला मुंबईहून सोबत घेऊन जाणाºया तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगीही अल्पवयीन असल्याने अटक केली आहे.
पीडित 13 वर्षीय मुलगी आई वडिलांसोबत वानवडीमध्ये राहते. 31 ऑगस्टच्या रात्री तिचा मित्र गावाहून तिला भेटण्यासाठी पुणे स्टेशनला येणार होता म्हणून ती पुणे स्टेशनला गेली होती. मात्र, तिचा मित्र आलाच नाही. त्यानंतर तिने बाहेर उभ्या असलेल्या रिक्षा चालकाला पुन्हा गाडी आहे का?
याची विचारणा करण्यासाठी गेली असता त्याने तिला घरी सोडण्याचा बहाणा केला. तिला रिक्षात बसवून घेऊन गेला. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने काही मित्रांना फोन करून बोलवून घेतले आणि त्यानंतर 2 दिवस या मुलीवर अत्याचार केला गेला. यात 6 रिक्षाचालक आणि दोन रेल्वेचे कर्मचारी यांनी अत्याचार केला. या मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून देण्यात आले होते.
या रिक्षाचालकांनी पीडितेवर अत्याचार केल्यानंतर तिला मुंबई बसमध्ये बसवून पाठवून दिलं होतं. तिथे तिचा मित्र आला होता, त्यानंतर ते चंदीगडला गेले. पोलिसांना लोकेशन मिळाल्यावर पोलिसांची टीम चंदीगडला विमानाने गेली आणि तिला ताब्यात घेतलं. आरोपी हे मिसिंगचा तपास करत असताना स्टेशन वरच्या सीसीटीव्ही फुटेजमधून रिक्षात बसताना दिसली.
त्या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याने तेव्हाच पोलिसांना बलात्कार केल्याची माहिती दिली पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र मुलगी मिळून येत नसल्यामुळे पोलीस गडबडले होते. शेवटी तांत्रिक लोकेशन मिळाल्यावर मुलीला ताब्यात घेण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App