विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई सारख्या शहरात धक्कादायक घटना घडली आहे .मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात ICU मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याची बाब समोर आली आहे. हि घटना अतिशय गंभीर आहे त्यामूळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. Shocking! A rat bit the eye of a patient in ICU at Rajawadi Hospital in Mumbai; inquiry order
श्रीनिवास यलप्पा (वय २४) असं या रुग्णाचं नाव असून दोन दिवसांपूर्वी त्याला दम लागत असल्यामुळे राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय तपासणीत श्रीनिवासला मेंदुज्वर आणि लिव्हरचा प्रॉब्लेम समोर आल्यानंतर त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरु करण्यात आले. आज सकाळी श्रीनिवासच्या नातेवाईकांना त्यांच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं दिसून आलं.
यानंतर त्यांनी ताबडतोक हॉस्पिटल प्रशासनाला याबद्दलची माहिती दिली. राजावाडी रुग्णालयातला ICU हा तळ मजल्यावर असल्यामुळे इथे उंदराचा वावर असल्याची तक्रार अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. प्राथमिक तपासणीनंतर श्रीनिवास यांचा डोळा उंदराने कुरतडल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या डीन विद्या ठाकूर यांनी दिली.
चौकशीचे आदेश –
पापण्यांचा आणि डोळ्याच्या आजुबाजूचा भाग कुरतडला गेला आहे. ही बाब अतिशय खेदजनक आहे. हा वॉर्ड सर्व बाजूनी बंद आहे. कुठूनही उंदीर आत येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. परंतू ICU तळ मजल्यावर असल्यामुळे पावसाळ्यात जेव्हा कधी दरवाडा उघडा राहिला असेल तेव्हा हा उंदीर आत शिरला असावा असा अंदाज आहे.
सदर रुग्ण हे व्हेंटीलेटरवर असल्यामुळे त्याला याची जाणीव झाली नसावी. नर्स आणि डॉक्टरांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णावर उपचापर केले आहेत. परंतू एवढी खबरदारी घेऊनही उंदीर आत येणं ही गंभीर बाब आहे, त्यामुळे या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App