धक्कादायक : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ३ दिवसांत ४ नवजात बालकांचा मृत्यू, रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Shocking 4 newborn babies die in 4 days in BMC Hospital, allegations of negligence at the hospital, high level inquiry order

 BMC Hospital : देशात सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई मनपाच्या (बीएमसी) रुग्णालयात ३ दिवसांत 4 नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रकरण महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले आहे. या घटनेत रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. अक्ष्यम्य निष्काळजीपणामुळेच या नवजात बालकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र सरकारसाठी ही शरमेची बाब आहे, अशी टीका सुरू झाली आहे. Shocking 4 newborn babies die in 4 days in BMC Hospital, allegations of negligence at the hospital, high level inquiry order


वृत्तसंस्था

मुंबई : देशात सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई मनपाच्या (बीएमसी) रुग्णालयात ३ दिवसांत 4 नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रकरण महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले आहे. या घटनेत रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. अक्ष्यम्य निष्काळजीपणामुळेच या नवजात बालकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र सरकारसाठी ही शरमेची बाब आहे, अशी टीका सुरू झाली आहे.

मुंबईतील भांडुप येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहात ३ दिवसांत ४ नवजात बालकांचा मृत्यू झाला. पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सांगण्यात आले आहे की, एसीमुळे या मुलांना संसर्ग झाला, त्यामुळे त्यांना वाचवता आले नाही.

३ दिवसात ४ नवजात बालकांचा मृत्यू

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित कुटुंबीयांनी सांगितले की, पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले होते. मुलगा झाला, पण त्याची प्रकृती बरी नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. उपचार सुरूच होते. सर्वात महागडी औषधे आणण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर 22 डिसेंबर रोजी रुग्णालय प्रशासनाने मुलाचा मृत्यू झाल्याचे कळवले. मृत्यूचे कारण संसर्ग असल्याचे सांगितले.

निष्काळजीपणाचा आरोप

३ दिवसांत बीएमसी हॉस्पिटलमध्ये ४ नातेवाईकांनी त्यांची नवजात बालके गमावली आहेत आणि सर्वांना संसर्गाचे एकच कारण सांगण्यात आले आहे. हा संसर्ग सर्व मुलांमध्ये सारखाच आहे. आपल्या मुलांचा जीव गेल्याचे कारण बीएमसी प्रशासन आणि रुग्णालयातील लोकांचे दुर्लक्ष असे पीडित कुटुंबीय सांगत आहेत. या घटनेनंतरही त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही आणि कोणीही बोलण्यास तयार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूती रुग्णालयात गेल्या ३ दिवसांत ४ अर्भकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाची घोषणा केली असून या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Shocking 4 newborn babies die in 4 days in BMC Hospital, allegations of negligence at the hospital, high level inquiry order

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात