शिवसेनेत फूट : 1992 – 2022; शिवसेनेत उफाळला ठाकरे निष्ठा विरुद्ध पवार निष्ठा संघर्ष!!


शिवसेनेला पवार नावाच्या राजकीय साडेसातीतून सुटताच येत नाही… हे पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे. 1992 मध्ये पवारांनी शिवसेनेचे 18 आमदार फोडले, त्यावेळी पवार सत्ताधारी होते. शिवसेना विरोधात होती. पण आता शिवसेना पवारांबरोबर सत्ताधारी आहे तरी देखील शिवसेनेला अवघ्या 2.5 वर्षात पवारांबरोबरची सत्ता किती घातक असते हे कळून चुकले आहे.

खुद्द शिवसेनेत गेल्या 2.5 वर्षांत खऱ्या अर्थाने ठाकरे निष्ठ विरुद्ध पवार निष्ठा संघर्ष उफाळला आहे. शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांच्या इच्छेविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे तडजोड करून स्वतः मुख्यमंत्री बनले. परंतु मुख्यमंत्र्यांना सरकार चालवताना ना आपल्या आमदारांना निधी देऊन समाधानी ठेवता आले, ना सत्तेची पदे त्यांना समाधानकारकपणे वाटता आली.

मुंबईसह ग्रामीण भागात गावागावांमध्ये शिवसेनेचा ज्या राष्ट्रवादीशी संघर्ष आहे, त्या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांची शिवसैनिकांना जुळवून घ्यावे लागणे यासारखे दुसरे राजकीय अपयश आणि राजकीय दुर्दैव होते. केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिद्दीमुळे आणि पवारांच्या धूर्तपणामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती घडू शकली. पण यातून शिवसेनेचे आमदार आणि मंत्री प्रचंड दुखावले गेले. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

शिवाय गेल्या 2.5 वर्षांमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या सत्तेच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय भांडवलीकरण पूर्ण करून घेतले. आपल्या आमदारांना शिवसेनेपेक्षा दुप्पट निधी देऊन आर्थिकदृष्ट्या मजबूत करून घेतले. शिवसेनेच्या आमदारांवर उघड – उघड राष्ट्रवादीच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी अन्याय केला आणि मुख्यमंत्री उघड्या डोळ्यांनी हे पहात राहिले. ते अजित पवारांना अटकाव करू शकले नाहीत हे शिवसेनेच्या आमदारांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले आणि त्यातून या बंडखोरीची पार्श्वभूमी तयार झाली आहे.

– संजय राऊत पवार निष्ठ

प्रताप सरनाईक यांनी उघडपणे आपल्याला भाजपशी फटकून राहता कामा नये आपली भाजपशी नैसर्गिक मैत्री आहे. ती पुन्हा करावी, अशी मागणी केली होती शिवसेनेच्या रायगडमधल्या तिन्ही आमदारांनी उघडपणे राष्ट्रवादी विरुद्ध बंडाचा पवित्रा घेतला होता. शरद पवारांची बाजू शिवसेनेत फक्त संजय राऊत घेत होते आणि ते अजूनही घेत आहेत. मध्यंतरी आदित्य ठाकरे आजोबांना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना महाविकास आघाडीचे सरकार आवडले असते, असे वक्तव्य केले होते. याचा अर्थ ठाकरे परिवार आणि संजय राऊत हेच फक्त पवारांची बाजू उचलून धरताना दिसत होतो आणि अखेर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आमदाराने मंत्र्यांचा बांध फुटला आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडापर्यंत परिस्थिती येऊन ठेपल्याचे दिसते.

Shivsena splits : sharad Pawar always makes trouble for Shivsena MLAs

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात