पत्त्यांचा बंगला कोसळला

इशारा दिला दम दिला
लालूच झाली दाखवून
कळलाव्या नारदाला
आमदारांनी ठेवले टांगून

गेले निघून सुरतला
यांच्या नाका खालून
चोळावे लागले नुसतेच हात
काकांनी घेतले झापून

काका मोठे मुत्सद्दी
करतात इकडेचे तिकडे
सामना वाजवे डंके
त्याचे ढोल फुटले

पंचवीस वर्षांचा वायदा
अडीच वर्षात आटोपला
काकांची साथ घेतल्याने
पत्त्यांचा बंगला कोसळला

व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर

Shivsena splits : satire poem on sharad Pawar and Sanjay Raut