विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची शिवसेनेची मागणी; पण 13 आमदारांपैकी किती ठाकरे गटामध्ये??


प्रतिनिधी

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ते कदाचित काही दिवस पुढे ढकलले जाईल. तथापि आता विधान परिषदेतला विरोधी पक्षनेते पदाचा वाद पुढे आला आहे. सध्या भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पद आहे. परंतु, आता शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजप नेते म्हणून प्रवीण दरेकर यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पद राहण्याची शक्यता कमी आहे. कदाचित त्यांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल. Shivsena demands opposition leaders position in maharashtra legislative council

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे घटाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावे अशी मागणी करणारे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पाठविले आहे. शिवसेनेचे विधान परिषदेत 13 आमदार आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये हे सर्वाधिक आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर वर वर पाहता शिवसेनेची मागणी रास्त वाटते. परंतु शिवसेनेच्या ठाकरे गटात यातले नेमके किती आमदार आहेत?, याचा हिशेब लागलेला नाही. विधानसभा शिवसेना पक्षात दोन तृतीयांश फूट पडून 40 आमदार शिंदे गटात आधीच गेले आहेत.

विधान परिषदेत मात्र अद्याप कोणते आमदार नेमके कोणाकडे?, याचा हिशेब लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने 13 आमदार ठाकरे गटात असल्याचा दावा केला आहे तो उपसभापती नीलम गोऱ्हे कशा पद्धतीने मानतात की त्या स्वतःच शिवसेनेच्या असल्यामुळे निर्णय देऊन मोकळ्या होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Shivsena demands opposition leaders position in maharashtra legislative council

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय