प्रतिनिधी
मुंबई : प्रसार माध्यमांनी राजकीय पक्षांची लग्न लावणे बंद करावे, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठी प्रसार माध्यमांचे वाभाडे काढले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांची आघाडी व्हावी, यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याच्या बातम्या काही मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. मात्र त्या बातम्या खोट्या असून माध्यमांनी राजकीय पक्षांची लग्न लावणे बंद करावे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे वाभाडे काढले आहेत. Shiv Sena – Prakash Ambedkar’s attack on the news of the Vanchit Aghadi
महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची आघाडी असावी, अशी इच्छा प्रकाश आंबेडकर यांनी फार पूर्वी व्यक्त केली आहे. या दोन्ही पक्षांना प्रकाश आंबेडकरांनी आघाडी करण्याची ऑफर दिली आहे. परंतु या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीची कोणतीही ऑफर नाही. तशी आम्ही ऑफर देणारही नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्हाला युतीच करायची नाही, असे प्रकाश आंबेडकरांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे.
मात्र या बातम्यांच्या आधारावर आज काही प्रसार माध्यमांनी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्या देऊन महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोडी असल्याचे भासविले होते. परंतु या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. मी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला नाही. त्यांच्याशी चर्चा देखील केलेली नाही. प्रसार माध्यमे स्वतःच्या मनाने काहीही छापतात. काहीही दाखवतात. प्रसार माध्यमांनी राजकीय पक्षांची आपल्याला हवी तशी लग्न लावणे बंद करावे, अशा शब्दांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मराठी माध्यमांचे वाभाडे काढले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App