काँग्रेसने धुडकावल्यानंतर गोव्यात “किंगमेकर” बनवण्याची शिवसेना – राष्ट्रवादीची महत्त्वाकांक्षा!!


प्रतिनिधी

पणजी : गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जंगजंग पछाडूनही काँग्रेसने त्यांच्या महाविकास आघाडीच्या प्रस्तावाला विचारले नाही किंबहुना धुडकावले. तरी देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता गोव्यात “किंगमेकर” बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आहे…!!Shiv Sena-NCP ambition to become Kingmaker in Goa after being ousted by Congress

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी गोव्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. गोवा विधानसभेच्या 40 पैकी नेमक्या किती जागा लढवणार हे या दोन्ही नेत्यांनी सांगितले नाही. कदाचित सर्व जागा लढवणार नाही पण गोव्यात आमच्या शिवाय कोणाचे सरकार येणार नाही, अशी परिस्थिती येईल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


गोव्यात सिंगल डिजिट जागांच्या मुद्द्यावरून संजय राऊत – वडेट्टीवार यांचे वार – पलटवार!!


शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी गोव्यात कोणतेही संघटनात्मक राजकीय अस्तित्व नसताना किंगमेकर बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगल्याने राजकीय वर्तुळात हे दोन्ही पक्ष वेगळ्या चर्चेचा विषय बनले आहेत. काँग्रेसने महाविकास आघाडीचा प्रस्ताव धुडकावला नंतर दोन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणुक लढवण्याची वेळ पर्यायच राहिला नाही, अशी खिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी उडवली आहे.

Shiv Sena-NCP ambition to become Kingmaker in Goa after being ousted by Congress

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”