शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामधून आपल्या ‘रोखठोक’ या सदरात सीमाभागातील मराठी भाषकांचा प्रश्न मांडला आहे. सीमाभागातील मराठी भाषकांच्या जिव्हाळ्याच्या अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला आहे. आपल्या लेखात राऊत असे म्हणाले की, बेळगावात मराठी भाषकांवर हल्ला झाला, तर कोल्हापूर सांगलीतील मराठी भाषिक त्याचा बदला कर्नाटकच्या बसेसवर हल्ला करून घेतात. परंतु हे लोण जर मुंबई पोहोचले तर कन्नडिगांना मुंबईत व्यवसाय करणे कठीण होऊन बसेल. पण अशा प्रकारांना कोणीही थारा देऊ नये, असे सांगायलाही राऊत विसरले नाहीत. Shiv Sena MP Sanjay Raut says Kannadigas May Find It Difficult To Do Business In Mumbai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामधून आपल्या ‘रोखठोक’ या सदरात सीमाभागातील मराठी भाषकांचा प्रश्न मांडला आहे. सीमाभागातील मराठी भाषकांच्या जिव्हाळ्याच्या अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला आहे. आपल्या लेखात राऊत असे म्हणाले की, बेळगावात मराठी भाषकांवर हल्ला झाला, तर कोल्हापूर सांगलीतील मराठी भाषिक त्याचा बदला कर्नाटकच्या बसेसवर हल्ला करून घेतात. परंतु हे लोण जर मुंबई पोहोचले तर कन्नडिगांना मुंबईत व्यवसाय करणे कठीण होऊन बसेल. पण अशा प्रकारांना कोणीही थारा देऊ नये, असे सांगायलाही राऊत विसरले नाहीत.
संजय राऊत यांनी लेखात म्हटले आहे की, बेळगावी आणि सीमाभागातील मराठी भाषकांचे दु:ख 65 वर्षे जुने आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. राम मंदिर, राफेल प्रकरणाप्रमाणे या प्रकरणाचीही तातडीने सुनावणी होणे गरजेचे आहे. बेळगाववर महाराष्ट्राचा दावा आहे आणि राहणार. भाषेच्या आधारावर पुनर्गठनानंतर हा भाग कर्नाटकात आहे. कर्नाटकात मराठीचा जेथे कुठे मुद्दा येतो तेथे दडपशाही सुरू होते. तेथे मराठी शाळांवरही कन्नड मुख्याध्यापकाची नेमणूक आहे. एवढेच नाही, तर मराठी भाषक वाघ असतात असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने चार तरुणांना पोलिसांनी मरेपर्यंत मारले, हा कुठला न्याय?
राऊत म्हणाले की, 65 वर्षांनंतरही बेळगावासह सीमा भागातील मराठी बांधव कसा जागरूक आणि पेटलेला आहे, हे प्रत्यक्ष पाहता आले. जनतेचे काही लढे हे भाषा व अस्मितेने भारलेले असतात व त्यासाठी रक्त सांडण्याचीही तयारी असते, तेव्हा हे लढे राज्यकर्त्यांना बंदुका रोखूनसुद्धा दडपता येत नाहीत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी 14 तारखेला बेळगावात पोहोचलो. तेव्हा भाजप उमेदवार श्रीमती मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडुरप्पा हे बेळगावातच होते. बाळेपुंद्रीत त्यांची सभा झाली. भाजपच्या उमेदवार श्रीमती अंगडी या चार लाख मतांनी जिंकतील असा फाजील विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री येडुरप्पा, त्यांचे मंत्रिमंडळ, राष्ट्रीय नेते यांना श्रीमती अंगडी यांच्यासाठी बेळगावात ठाण मांडून बसावे लागले यातच सर्व आले. एकीकरण समितीचे 26 वर्षांचे तरुण उमेदवार शुभम शेळके याने भगव्या झेंडय़ाखाली समस्त मराठी बांधवांना एकत्र यायला भाग पाडले. हे आव्हान मराठी माणसाने अनेक वर्षांनी उभे केले. शुभम शेळके या तरुणासाठी मराठी कार्यकर्त्यांची जुनी व नवी पिढी एकत्र आली. हे ऐक्य अनेक वर्षांनंतर बेळगावच्या मराठी भूमीत दिसत आहे. आपले मराठीपण टिकविण्यासाठी बेळगावसह सीमा भागातील मराठी माणूस 65 वर्षांपासून लढत आहे. पेंद्र सरकार त्याच्या बाजूने नाही. न्यायालयात निर्णय लागत नाही. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची अनास्था त्याला कमजोर करीत आहे. बेळगावातील मराठी एकजुटीस तडे गेले तरी लढाई संपलेली नाही व शुभम शेळकेच्या निमित्ताने लढाईचे नवे पर्व जणू सुरू झाले.
राऊतांनी या ज्वलंत मुद्द्यावर चिंता व्यक्त करताना पुढे लिहिले की, कर्नाटक सरकारचे बरेचसे अर्थकारण हे महाराष्ट्रावर अवलंबून आहे हे कुणीच समजून घेत नाही. कर्नाटकातून रोज किमान 650 बसेस महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रातून रोज फक्त 50 बसेस कर्नाटकात जातात. कर्नाटकच्या परिवहन खात्यालाच महाराष्ट्रातून रोज 30 लाखांचा महसूल मिळतो. त्यामुळे बेळगावात मराठी लोकांवर हल्ले होताच कोल्हापूर-सांगलीत शिवसेनेचे लोक कर्नाटकच्या बसेसवर हल्ले करून बदला घेतात. हे लोण मुंबईत पोहोचले तर कर्नाटकातील लोकांचे व्यापार-उद्योग चालवणे कठीण होईल. पण या थराला आता कोणी जाऊ नये. कर्नाटक सरकारने बेळगावातील मराठी लोकांना दुश्मन मानू नये व मराठी भाषेसंदर्भातले त्यांना घटनेने दिलेले अधिकार मान्य करावे. पण कर्नाटक सरकारने केंद्राच्या कानाला लागून काय केले?
सीमा भागात आज ‘मराठी’ वेदना मांडणारा स्वतःचा आमदार नाही. खासदार नाही. या वेदनेतून आज बेळगावातील मराठी माणूस पुन्हा एकवटला आहे. लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल जो लागायचा तो लागेल, पण नव्या पिढीने मराठी एकजुटीची, नव्या लढय़ाची सूत्रे हाती घेतली. त्यांना निदान शुभेच्छा देणे हे महाराष्ट्राचे काम आहे. 65 वर्षे सुरू असलेल्या सीमा लढय़ाचे नवे पर्व सुरू झाले असेल तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी आता त्यांना पाठिंबा द्यावा. मराठी लोकांशी इमान राखण्याची हीच वेळ आहे.
संजय राऊत यांचा मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Shiv Sena MP Sanjay Raut says Kannadigas May Find It Difficult To Do Business In Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App