विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या विरोधात शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आपल्या आमदारांना बळ देण्यासाठी भरपूर प्रयत्न करताना दिसतात. उपमुख्यमंत्री अजित पवार निधी वाटपात आपल्या आमदारांना झुकते माप देताना शिवसेना आमदारांवर अन्याय करतात. याच्या उघड तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत तरी ते गप्प आहेत!! Shiv Sena MLAs upset over NCP in Maharashtra; Sanjay Raut’s advice to Congress to get rid of confusion !!
अजय चौधरींपासून प्रताप सरनाईकांपर्यंत आणि विजय शिवतारेंपासून गुलाबराव पाटलांपर्यंत सगळ्यांचाच राष्ट्रवादीच्या नेत्यांची उभा राजकीय दावा आहे. या आमदार आणि मंत्र्यांनी जाहीरपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वाभाडे काढले आहेत. त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. त्यावर संजय राऊत भाष्य करत नाहीत पण काँग्रेसला मात्र उपदेश करतात याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी असा राजकीय तिढा बसलेला असताना तो सोडविण्याऐवजी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र सामनातून काँग्रेसला त्यांच्या पक्षांतर्गत सुरू असलेला गोंधळ सावरण्याचा सल्ला दिला आहे.
पंजाबमध्ये आणि केंद्रीय पातळीवर काँग्रेस मध्ये सावळागोंधळ आहे हे उघड दिसते आहे. पण आपल्या पक्षातला गोंधळ सावरण्याची जबाबदारी काँग्रेस नेत्यांची आहे. तशीच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या तिढा सोडविण्याची जबाबदारी शिवसेना नेत्यांची आहे. पण ही जबाबदारी सोडून संजय राऊत यांनी काँग्रेसला आपला गोंधळ निस्तरण्यासाठी सल्ला दिला आहे.
हे करताना त्यांनी काँग्रेसमध्ये जर आज इंदिरा गांधींचे नेतृत्व असते तर पंजाब मधल्या नेत्यांची केंद्रातल्या नेत्यांविरोधात वक्तव्य करण्याची हिंमत झाली नसती, असे टोचून घेतली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर टिकून आहे. असे असताना देखील आपल्या स्वतःच्या पक्षातल्या अस्वस्थ आमदारांच्या अस्वस्थतेवर तोडगा काढण्याऐवजी संजय राऊत हे काँग्रेसला ङिवचताना दिसत आहेत. त्यामुळे देखील काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातल्या संबंधांमध्ये तणाव येण्याची चिन्हे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App