विशेष प्रतिनिधी
सांगली – शिवसेना ही मुख्यमंत्रीपदाच्या एका गुबगूबीत खुर्चीपुरती मर्यादित झाली असून संपतही चालली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. Shiv Sena confined to a soft chair; Criticism of Chandrakant Patil
सांगलीमध्ये पाटील हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते. मंत्री जयंत पाटील यांना घेरावा घातला ही सांगलीतील स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्यच असून जनता आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादीला वैतागले आहेत, असा टोला ही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
मुंबई बँकेत चेअरमन राष्ट्रवादी आणि व्हाईस चेअरमन भाजपाचा निवडून आला आहे. त्यामुळे आता तर शिवसेनेला कळायला हवं की, शिवसेनेला फक्त एक मुख्यमंत्रीपदाची गुबगुबीत खुर्ची मिळाली आहे, बाकी काही मिळालं नाही. शिवसेनेला सहकार, विद्यापीठ कायदा अशा अनेक गोष्टीची माहिती नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसचा प्रचार केला काय किंवा शिवसेनेचा तरी सांगलीत भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे. मात्र सांगलीतील शिवसैनिकांनी मांडलेली भूमिका योग्य असून सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हा वैतागलेला आहे. त्याचे चित्र म्हणजे जयंत पाटील यांना शिवसैनिकांनी सांगलीत घातलेला घेराव आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App