एका पक्षाचा वर्धापन दिन, दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन; एक फरक…!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई – एका पक्षाचा वर्धापन दिन आणि दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन या विषयी आज सायंकाळनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ऑनलाइन साजरा केला. त्यांना मोठ्या सभागृहात वर्धापन दिन करता आला असता पण त्यांनी शिवसैनिकांची गर्दी जमविणे टाळले. याचे कौतूक होत आहे. shiv sena 55; uddhav thackeray made it online; ajit pawar couldn`t prevent crowd in pune NCP office

पण आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांची गर्दी टाळता आली नाही. तेथे प्रचंड गर्दी झाली होती. कोरोना नियमावली पायदळी तुडविण्यात आली.



त्यानंतर राज्य सरकारवरच टीका होऊ लागली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “गाडीतून उतरत असताना उदघाटन न करता निघून जावे असा विचार आला होता. मात्र कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असता. पण आजच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. दिमाखदार कार्यक्रम होत असताना तुम्ही नियम पाळले नाहीत, त्यामुळे मनात खंत वाटते”. कार्यक्रम झाल्यानंतर गर्दीविषयी अजित पवारांना विचारणा केली गेली. त्यावेळी. “कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक करावाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे”, असं अजित पवार म्हणाले. पण त्यांनी तसे सांगितले की नाही, या विषयी कळायला मार्ग नाही.

अजित पवारांनी पुणेकरांना दम देखील भरला. निर्बंध उठले की तुम्ही गर्दी करता. लोणावळा, महाबळेश्वर सारखी पर्यंटन स्थळे गजबजतात पण त्यामुळे कोरोना वाढतो. आणि पुन्हा निर्बंध लावावे लागतात, असे अजित पवार म्हणाले. पण पुण्याच्या स्वतःच्याच पक्षातल्या कार्यक्रमातली कार्यकर्त्यांची गर्दी त्यांना टाळता आली नाही.

shiv sena 55  uddhav thackeray made it online; ajit pawar couldn`t prevent crowd in pune NCP office

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात