शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव माझाच, मी उपमुख्यमंत्री झाल्याने प्रतिष्ठेत अधिक भर; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती


प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव माझाच होता तो भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वीकारला इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणे हा सुरुवातीला माझ्यासाठी धक्का असला तरी ते पद स्वीकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात माझ्याच प्रतिष्ठेत भर पडली, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.Shinde’s proposal for the post of Chief Minister is mine, I am the Deputy Chief Minister and added to the prestige; Devendra Fadnavis’ candid speech

इंडिया टुडे कनकलेव्हमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या समावेत विविध प्रश्नांना उत्तरे देताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. आधीच्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने फक्त 2014 ते 19 मध्ये सुरू केलेल्या प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम केले त्यामुळे त्यांचे आव्हान आमच्यापुढे नाहीच उलट आम्हीच आधीच्या सरकारमध्ये सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करत जाऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ना यशस्वीरित्या सामोरे जाऊ आणि 2019 मध्ये 41 मतदार संघ जिंकल्यानंतर त्यापेक्षा जास्त मतदार संघ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकू असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद या मुद्द्यांवरून प्रश्नकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना वारंवार छेडले. उलटे पालटे प्रश्न विचारले. मात्र त्यावर फडणवीस यांनी स्पष्ट उत्तरे देऊन प्रश्नकर्त्यांनाच गप्प केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, की शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले पाहिजे, असे केंद्रीय नेतृत्वाचे मत होतेच.

ण त्याही पलिकडे जाऊन मी म्हणेन की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव माझाच होता. त्या प्रस्तावाला केंद्रीय नेतृत्वाने मान्यता दिली. परंतु मला उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला लावणे हा सुरुवातीला माझ्यासाठी धक्का होता. पण केंद्रीय नेतृत्वाने काही निश्चित राजकीय धारणेतून उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी माझे मन वळविले आणि आता मला निश्चित वाटते की मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारणे हे पक्षाच्या हिताचेच आहे आणि ते पद स्वीकारल्याने माझी मुख्यमंत्रीपदासारखीच किंबहुना त्यापेक्षा जास्त राजकीय प्रतिष्ठा वाढली आहे.

Shinde’s proposal for the post of Chief Minister is mine, I am the Deputy Chief Minister and added to the prestige; Devendra Fadnavis’ candid speech

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण