नाटककार शेखर ताम्हाणे यांचे ठाण्यात कोरोनामुळे निधन

विशेष प्रतिनिधी 

मुंबई – `सविता दामोदर परांजपे`, `तू फक्त हो म्हण`, `तिन्ही सांज` आणि `वेलकम जिंदगी`सारख्या नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे (वय ६८) यांचे कोरोनाने निधन झाले. ठाण्यातील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी व जावई असा परिवार आहे. Shekhar Tamhane is no more

मागील वर्षी कोरोना काळात नाट्यकर्मींसाठी मदत निधी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. काही दिवस ते ठाण्यातील रुग्णालयात कोरोनामुळे उपचार घेत होते. आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन झाले. शेखर ताम्हाणे यांची प्रकृती गंभीर होती. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांचे निधन झाले.

नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते राजन ताम्हाणे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. शेखर ताम्हाणे यांचे `सविता दामोदर परांजपे` नाटक खूप लोकप्रिय ठरले. या नाटकावर त्याच नावाचा चित्रपटदेखील आला होता. त्यांनी नाटकांबरोबरच अनेक एकांकिकादेखील लिहिल्या होत्या. नाटककार म्हणून त्यांना सामाजिक भानही जपले होते.

Shekhar Tamhane is no more


महत्त्वाच्या बातम्या