‘’पक्ष गेला, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला.’’ असं देखील शीतल म्हात्रेंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या दररोज अचंबित करणाऱ्या घडामोडी दिसत आहेत. कधी मातोश्री सोडून अन्य नेत्याच्या भेटीसाठी त्याच्या दारी न जाणाऱ्या उद्धव ठाकरेंनी काल शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक गाठलं. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत होते. तर, शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे होत्या. ही भेट राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण, मागील काही दिवसांपासून शरद पवारांकडून येत असलेली विधानं पाहता, महाविकास आघाडीत सारं काही नक्कीच आलबेल नाही, असंच दिसून येत आहे. त्यामुळे या भेटीनंतर आता विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. शिवसेना(शिंदे गट) नेत्या शीतल म्हात्रे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. Sheetal Mhatres criticism of Uddhav Thackeray going to Silver Oak to meet Sharad Pawar
ठाकरे – पवार सिल्वर ओकवर भेट; महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा की काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट??
‘’लाचरांची स्वारी ‘सिल्वर ओक’च्या दारी… आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला. कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला. पक्ष गेला, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला.’’ असं शीतल म्हात्रेंनी ट्वटीद्वारे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
लाचारांची स्वारी सिल्व्हर ओक च्या दारी…आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला… कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला…पक्ष गेले, चिन्ह गेले…आणि आता स्वाभिमानही गेला… pic.twitter.com/AOP5HW5nSQ — sheetal mhatre (@sheetalmhatre1) April 11, 2023
लाचारांची स्वारी सिल्व्हर ओक च्या दारी…आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला… कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला…पक्ष गेले, चिन्ह गेले…आणि आता स्वाभिमानही गेला… pic.twitter.com/AOP5HW5nSQ
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) April 11, 2023
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नाही. त्यांनी परस्पर राजीनामा दिला त्यांनी सहकारी पक्षांबरोबर डायलॉग ठेवायला हवा होता, असे वक्तव्य शरद पवारांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत केल्याबरोबर उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं समोर आलं आहे.
मात्र ही भेट पूर्वनियोजित असल्याचा बातम्या काही मराठी माध्यमांनी दिल्या. कारण काल संजय राऊत यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट नियोजित करण्यात आली.
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योजक गौतम अदाणी यांचं एकप्रकारे समर्थन केलं होतं. तर अजित पवार यांनीही ईव्हीएमचं समर्थन करत विरोधी भूमिका घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App