शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची ‘SIT’ कडून चौकशी होणार!

Shambhuraj desaiand Shital Mhatare

मंत्री शंभूराज देसाई यांनी विधीमंडळत केली घोषणा

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची आता विशेष चौकशी पथकाकडून (SIT)कडून चौकशी केली जाणार आहे. आज विधीमंडळात मंत्री शंभूराज देसाई यांनी ही घोषणा केली. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी गठीत केली जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. Sheetal Mhatre viral video case will be investigated by SIT Shambhuraj Desai

या व्हिडिओ प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय व युवा सनेचे पदाधिकारी साईनाथ दुर्गे व मातोश्री हे फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. पाच जणांपैकी चार जण हे ठाकरे गटाचे तर एक जण हा काँग्रेसचा असल्याची माहिती समोर आली आहे.


शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ व्हिडीओचा मास्टरमाईंड कलानगरमध्ये… – नितेश राणेंचा थेट आरोप!


शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोपही शीतल म्हात्रे यांनी केला.

याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज एक खळबळजनक आरोप केला आहे. ”हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला? ही मस्ती कोणी केली याचे पुरावे इथे आहेत. मी हेही सांगेन की हे जे व्हायरल करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मागचा मास्टरमाईंड असेल, त्यांना कोणीतरी हे करायला लावलं असेल. माझा थेट आरोप आहे की या मागचा मास्टरमाईंड हा कलानगरमध्ये बसलेला आहे. ” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

Sheetal Mhatre viral video case will be investigated by SIT Shambhuraj Desai

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात