प्रतिनिधी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर ईडीकडून नॅशनल स्टॉक एक्सचेंज कथित फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे यांच्यासह एनएसईचे माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांना आज शुक्रवारी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने समन्स पाठवले आहे.Share Scam, Phone Tapping: Sanjay Pandey’s Trouble Rises, CBI Probes With ED; Summons from ED today!!
संजय पांडे यांच्या विरोधात यापूर्वी सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले, तर ईडीने सुद्धा २ गुन्हे दाखल केले आहेत. संजय पांडे हे पोलीस खात्यातून निवृत्त होताच केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर आले असून त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ होत असताना दिसून येत आहे. तसेच एनएसईचे माजी प्रमुख रामकृष्ण हे सीबीआयच्या अटकेत असून कथित घोटाळ्या प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेले असून, दिल्ली न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीला त्याची चार दिवसांची कोठडी दिली आहे.
पांडे यांच्यावर नवीन गुन्हा दाखल
सीबीआयने संजय पांडे त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर एका आठवड्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत पांडे यांच्यावर नवीन गुन्हा दाखल केला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे दोन्ही माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेन आणि रामकृष्ण यांनी शेअर बाजारातील कर्मचार्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करून त्यांची हेरगिरी करण्यासाठी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी पांडे यांनी स्थापन केलेल्या कंपनीला काम दिले होते, त्यात पांडे यांचा सहभाग असल्याचा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने केला होता. सीबीआयनंतर ईडीने संजय पांडे, त्यांची दिल्ली येथील कंपनी आयएसईसी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड, एनएसईचे माजी एमडी आणि सीईओ नारायण आणि रामकृष्ण, कार्यकारी उपाध्यक्ष रवी वाराणसी आणि प्रमुख महेश हल्दीपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या कथित बेकायदेशीर कृत्यात आर्थिक व्यवहार झाला आहे का?, याचा तपास ईडी करीत असून ईडीने बुधवारीच एनएसईला नोटीस पाठवून या संबंधीचे कागदपत्रे चौकशीसाठी मागवून घेतली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करण्याच्या मोबदल्यात संजय पांडे यांच्या कंपनीला ४ कोटी ४५ लाख मिळाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. विशेष म्हणजे फोन टॅपिंगसाठी एनएसई कर्मचाऱ्यांची परवानगी घेण्यात आली नव्हती, अशीही माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App