शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस


वृत्तसंस्था

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घरीच कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून ते घरी विश्रांती घेत आहेत. त्यामुळे शरद पवारांनी निवासस्थानीच कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी सुप्रिया सुळे, डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. शरद पवार यांनी ट्विट करून कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली आहे. sharad pawar second dose of corona vaccine at his residenceपवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!”.

शरद पवारांनी यावेळी लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कोरोनाविरोधातील लढाईत सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे ते म्हणाले.

sharad pawar second dose of corona vaccine at his residence

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था