प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यानंतर महाविकास आघाडी संपूर्ण विखुरल्यात जमा आहे. तशी लक्षणे घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यातून दिसत आहेत. त्या पलीकडे जाऊन आज उद्धव ठाकरेंच्या सामनाने थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चालवणारा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरल्याचा ठपका सामनाने त्यांच्यावर ठेवला आहे, इतकेच नाहीतर पवारांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि राजकीय कर्तृत्वाची परखड शब्दांत मर्यादाही दाखवून दिली आहे. Sharad Pawar failed to create appropriate political heir in NCP
पवार राष्ट्रीय नेते आहेत त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसचा शेंडा, बुडखा आणि बुंधा सर्वकाही महाराष्ट्रातच आहे आणि पवारांच्या सहकार्यांनाच सगळे महाराष्ट्रातच हवे आहे, अशा शब्दांत सामनाने पवारांच्या राष्ट्रीय राजकारणाचे वाभाडे काढले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर महाविकासआघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना-ठाकरे गटाने मोठं विधान केलं आहे. “शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असे शरसंधान सामनाने साधले आहे.
सामना अग्रलेखात म्हणतो :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही.
पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App