प्रतिनिधी
पुणे : दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार अस्थिर असल्याचे सांगून मध्यावधी निवडणुकांची होऊन उठवली होती. Sharad Pawar dismissed Uddhav Thackeray’s predictions of mid term polls in maharashtra
दरम्यानच्या काळात ही चर्चा थंडावली. पण सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या संघर्षादरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेला आल्यावर पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांची चर्चा उद्धव ठाकरेंनी सुरू केली. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे 16 आमदार जर अपात्र ठरविले तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे भाकीत उद्धव ठाकरे यांनी केले.
“राष्ट्रीय” नेते शरद पवार कसबा – चिंचवडच्या पोटनिवडणूक प्रचारात!!; त्यांचे राष्ट्रीय ते स्थानिक नेहमीच फ्लिप – फ्लॉप!!
मात्र उद्धव ठाकरे यांचे हे भाकित शरद पवारांनी फेटाळून लावले आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणत्या राजकीय परिस्थितीच्या आधारे हे वक्तव्य केले हे मला माहिती नाही. पण महाराष्ट्रात आज अस्थिर राजकीय परिस्थिती आहे, असे वाटत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील असेही वाटत नाही, अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचे मध्यावधी निवडणुकांचे भाकित फेटाळले आहे.
महाविकास आघाडी एकसंधपणे भाजप विरोधात उभी असल्याचे भासवत असली तरी घटक पक्षांचे नेते वेगवेगळ्या मुद्द्यांवर परस्परविरोधी मते व्यक्त करत असल्याचे अनेकदा दिसले आहे. मध्यावधी निवडणुकांच्या बाबतीतही उद्धव ठाकरे यांचे भाकीत फेटाळून शरद पवारांनी याच मतभिन्नतेचा प्रत्यय दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App