प्रतिनिधी
औरंगाबाद : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी केले होते. परंतु आज औरंगाबाद मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या वक्तव्यावरून घुमजाव केल्याचे दिसून आले. Sharad Pawar backtracked over the issue of mid term polls and renaming cities of aurangabad and usmanabad
आपण मध्यावरी निवडणुका होतील, असे बोललोच नव्हतो तर आता सरकारची अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. उरलेली अडीच वर्षे हातात आहेत. पण त्यातही शेवटचे सहा महिने हे निवडणुकीच्या वातावरणातच जातात त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत, असे मी म्हणालो होतो, असे शरद पवारांनी औरंगाबादच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Sharad Pawar : फडणवीस – राज ठाकरेंशी पंगा वाढवायची राष्ट्रवादीची तयारी!!; दिलीप वळसेंच्या टार्गेटवर फडणवीस – राज!!
– नामांतराच्या मुद्द्यावर घुमजावा
त्याचबरोबर ठाकरे – पवार मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी विरोध केला होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनीच अंतिम निर्णय घेण्याची पद्धत असते. त्यामुळे तो मंत्रिमंडळाचाच निर्णय मानला गेला. परंतु संबंधित निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी अथवा काँग्रेसच्या नेत्यांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली नव्हती, असा खुलासा शरद पवारांनी केला.
– राज्यपालांवर शरसंधान
मध्यावधी निवडणुकांचा मुद्दा आणि औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा या दोन्ही मुद्द्यांवरून पवारांनी आज घुमजाव केल्याचे त्यांच्याच पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले. त्याचवेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले. विधानसभेचे अध्यक्ष निवडण्यासाठी राज्यपालांना बाकीच्या महत्त्वाच्या कामांमुळे तब्बल दीड वर्षे वेळ मिळाला नव्हता. पण नवीन सरकार आल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांना वेळ मिळाला आणि त्यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी परवानगी दिली, असा खोचक टोला शरद पवारांनी भगतसिंह कोशियारी यांना लगावला.
– गोवा काँग्रेस फूटीवर भाजपला आठवला
गोव्यामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडत आहे. 8 ते 10 आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. या मुद्द्यावर शरद पवारांनी मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र याची उदाहरणे देऊन गोव्यात भाजपने फारच वेळ लावला, असा टोमणा मारला.
– शिवसेनेतील फूट सावध भूमिका
शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आपला पक्ष वाचवण्यात यश आले नाही का? अजित पवारांचे बंड आपण रोखलेत पण शिवसेनेतले बंड का रोखले नाहीत? या सवाल शरद पवारांनी सावधपणे उत्तरे दिली. अजित पवारांच्या बंडाच्या वेळी तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न होता. कारण राष्ट्रवादीतले लोक फुटले होते. आता शिवसेनेतले लोक फुटले हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या संदर्भात काय केले?, याची मला माहिती नाही. त्यावर मी कुठलेही भाष्य करणार नाही, असे सांगून शरद पवारांनी त्या विषयापासून स्वतःला बाजूला काढून घेतले.
– महाविकास आघाडीने एकत्र लढावे
आगामी महापालिका निवडणुका तसेच 2024 मधल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात असे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगून शरद पवारांनी तेथेही सावध भूमिका घेतली. एकत्रित निवडणुका लढविण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा झालेली नाही. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या नेत्यांबरोबरही चर्चा झालेली नाही. या चर्चा करून मगच अंतिम निर्णय घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App