विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : अहमदनगर येथील राहुरी कृषी विद्यापीठाचा (rahuri agriculture university) ३५ वा दीक्षांत समारोह पार पडला. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin gadkari) एकाच मंचावर आले होते . Sharad Pawar and Nitin Gadkari ‘Shining Star’ of the country; Appreciation from the Governor
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे कौतुक केले. तसेच हे दोन्ही नेते चमकते तारे असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन्ही नेते उत्तम काम करतात. दोन्ही नेते देशाचे चमकते तारे आहेत. पवार आणि गडकरी दोघांनाही दीर्घ आयुष्य लाभो, असे राज्यपाल म्हणाले. तसेच त्यांनी गडकरी आणि पवार या दोन्ही नेत्यांच्या कामाचे कौतुक केले.
कृषिमंत्री दादा भुसे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानिमित्ताने त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नितीन गडकरी यांच्याकडे काही मागण्या केल्या. पीक विम्यासंदर्भात काही बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी नितीन गडकरींनी आपला मोलाचा वेळ देऊन लक्ष घालावे, अशी विनंती भुसे यांनी गडकरींना केली. तसेच कृषी विद्यापीठासाठी स्टाफ आणि संशोधनासाठी निधी मिळावा यासाठी भुसे यांनी शरद पवारांना विनंती केली. तसेच कृषी विद्यापीठातील कामकाज मराठीतून व्हावं. त्यासाठी राज्यपालांनी तसा आदेश काढावा, अशी विनंती देखील कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली.
विद्यापीठाचा पोशाख बदलण्याची गरज आहे. विद्यापीठाचा आजचा पोशाख भगवा आहे. त्याबाबत आनंद आहे. पण, ते जड आहेत. त्यामुळे हा पोशाख बदलविण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असेही कृषिमंत्री राज्यपालांना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App