मोदींनी विश्वासात घेतले नाही म्हणून नव्या संसद भवन उद्घाटन कार्यक्रमावर शरद पवारांचाही बहिष्कार

प्रतिनिधी

मुंबई : नवीन संसद भवन बांधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही म्हणून विरोधी पक्ष नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. या बहिष्काराला शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे.Sharad Pawar also boycotted the inauguration program of the new Parliament House as he did not believe Modi

नव्या संसद भवनाचे उद्घाटन उद्या 28 मे 2023 रोजी सावरकर जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेस सह 21 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. या बहिष्काराला आता शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे.



या संदर्भात शरद पवार म्हणाले, की मी राज्यसभेचा सभासद आहे. पण संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन झाले ते आम्ही वर्तमानपत्रात वाचले. त्यावेळी देखील कोणाला निमंत्रण नव्हते. आता संसद भवनाचे उद्घाटन होत आहे या सर्व प्रक्रियेत सरकारने खासदारांना विश्वासात घेतले नाही. सर्वसाधारणपणे अशा मोठ्या भवनांचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होत असते. पण तसही केले जात नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. त्याला माझा पाठिंबा आहे.

Sharad Pawar also boycotted the inauguration program of the new Parliament House as he did not believe Modi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात