गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयाने (SFIO) दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, औरंगाबाद आणि अहमदनगर या पाच शहरांमध्ये पसरलेल्या व्हिडिओकॉन समूहाच्या कार्यालयांवर तीन दिवस छापे टाकले. 13 जुलै ते 15 जुलैदरम्यान छापे टाकण्यात आले. यासंदर्भात 8 जून रोजी सरकारने गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयाला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) च्या देखरेखीच्या आधारावर या समूहाविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. Serious Fraud Investigation Office SFIO Conducted Search Operation At Premises Connected To Videocon Group
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयाने (SFIO) दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, औरंगाबाद आणि अहमदनगर या पाच शहरांमध्ये पसरलेल्या व्हिडिओकॉन समूहाच्या कार्यालयांवर तीन दिवस छापे टाकले. 13 जुलै ते 15 जुलैदरम्यान छापे टाकण्यात आले. यासंदर्भात 8 जून रोजी सरकारने गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयाला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) च्या देखरेखीच्या आधारावर या समूहाविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे (आरओसी) नोंदणीकृत 80 कार्यालयांवर गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयाने छापे टाकले. यानंतर ग्रुपवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात, NCLT ने व्हिडिओकॉन समूहाच्या 13 कंपन्यांच्या रिझोल्यूशन योजनेला मंजुरी दिली होती. या कंपन्यांवर बँकांचे 62 हजार कोटींचे कर्ज होते.
एवढेच नाही, तर व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. यासह एजन्सीने रिझोल्यूशन प्रोफेशनलचाही शोध घेतला आहे. या प्रकरणात SAPIOने डिजिटल डेटा, अकाउंट बुक आणि कंपन्यांचे सर्व्हरही जप्त केले आहेत. व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज आणि इतर 12 कंपन्यांची दिवाळखोरी प्रक्रिया हाताळण्यासाठी रिझोल्यूशन प्रोफेशनलची नेमणूक करण्यात आली होती.
व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज 26 मोठ्या दिवाळखोर कंपन्यांपैकी एक आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने जूनमध्ये दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, एकूण 71,433 कोटी रुपयांपैकी 64,838 कोटी रुपयांचे दावे स्वीकारले गेले. यापैकी केवळ 2,962 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्व दिवाळखोर कंपन्यांची यादी NCLT ला दिली होती.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय व्हिडिओकॉन समूहाचीही चौकशी करत आहे. गेल्या वर्षी धूत यांच्याविरोधात दाखल झालेल्या सीबीआय प्रकरणावर हे प्रकरण आधारित आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कन्सोर्टियमसह बँकांचे कर्ज बुडवल्याचा आरोप या समूहावर आहे.
Serious Fraud Investigation Office SFIO Conducted Search Operation At Premises Connected To Videocon Group
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App