विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यातील शाळा १९ जानेवारीपाून सुरू करण्यात आल्या. मात्र पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितली. School’s reopen in Pune at 1 February
मास्क काढायला लागेल अशा अॅक्टिव्हिटी शाळा टाळणार आहेत. पालकांनी विद्यार्थ्यांना मास्कचं बंधन करावे, असे आवाहन पवार यांनी केले. नववीच्या शाळा पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. तर आठवी पर्यंतच्या शाळा चार तास भरवल्या जाणार आहेत. कोरोना पुन्हा ओसरल्यावर आता शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार आहे. शाळेची वेळ फक्त चार तास असेल. विद्यार्थ्यांनी डबा न आणता नाश्ता करून यायचे, आणि त्यानंतर जेवण घरी जाऊन करायचे अशा सुचना देण्यात येतील, असे पवार यांनी नमूद केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App