राज्यात शाळांची ४ ऑक्टोबरपासून पुन्हा घंटा वाजली. जरी शाळा सुरु झाल्या असल्या तरी, कोरोनाचे सावट पूर्णपणे न गेलेले नाही.Schools in the state announce Diwali holidays, but confusion persists
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात मागील दीड वर्षापासून कोरोनामुळं शाळांची किलबिलाट बंद होती, त्यानंतर राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत गेल्याने राज्य शासनाने अनेक ठिकाणी अनलॉक केले आहे. त्यामुळं राज्यात शाळांची ४ ऑक्टोबरपासून पुन्हा घंटा वाजली. जरी शाळा सुरु झाल्या असल्या तरी, कोरोनाचे सावट पूर्णपणे न गेलेले नाही.
मात्र, अवघ्या आठ दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत शाळांना दिवाळीची सुट्टी १ ते २० नोव्हेंबर दरम्यान असणार आहे. या दरम्यान, शाळा ऑनलाईन वर्गही बंद ठेवतील, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
मात्र, शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच्या वेळापत्रकात दिवाळीच्या सुट्या १ ते २३ नोव्हेंबर अशा दर्शविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शाळा, पालक आणि विद्यार्थ्यी यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नक्की कोणते दिवस आणि किती दिवस दिवाळी सुट्या आहेत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App