मोठी बातमी : ठाणे शहरातील शाळा, महाविद्यालये दहावी व बारावी वगळून ४ ते ३१ जानेवारीपर्यंत बंद


ओमिक्रोन आणि कोव्हिड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार संसर्ग रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्गासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवून ऑनलाईन पध्दतीने वर्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे. School and colleges in Thane City except class 10th and 12th will closed from 4th January to 31st January due to corona crisis


प्रतिनिधी

ठाणे : ओमिक्रोन आणि कोव्हिड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार संसर्ग रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्गासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवून ऑनलाईन पध्दतीने वर्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.

सद्यस्थितीत सर्वत्र ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकारचा वाढता प्रभाव व कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व 11 वीच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळा दिनांक 4 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत. तर 10 वी व 12 वीचे नियमित वर्ग सुरूच राहणार आहे.यामध्ये इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व 11 वी या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने वर्ग सुरू राहणार आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील 15 ते 18 वर्षे वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण सुरू राहणार आहे. याकरिता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी शाळेत बोलविण्यात येणार आहे. तरी कोरोनाचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने 15 ते 18 वयोगटासाठी सुरू करण्यात लसीकरण मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रात जावून लस घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

School and colleges in Thane City except class 10th and 12th will closed from 4th January to 31st January due to corona crisis

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती