सावरकर – हेडगेवारांचे धडे कर्नाटक सरकारने वगळले; भाजपने टीकास्त्र सोडल्यानंतर ठाकरे गटाचीही काँग्रेसवर टीका

प्रतिनिधी

मुंबई : कर्नाटकात बहुमतानिशी सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारचे महत्त्वाचे निर्णय फिरवणाऱ्या काँग्रेस सरकारने अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे धडे वगळले. या मुद्द्यावरून कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार शरसंधान साधले. त्याचवेळी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान देईपर्यंत ठाकरे गटाच्या कोणाही नेत्याने काँग्रेस विरुद्ध “ब्र” काढला नव्हता. पण आता मात्र ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी काँग्रेस सरकारच्या निषेध केला आहे.Savarkar-Hedgewar Lessons Dropped by Karnataka Govt.; After BJP dropped its criticism, Thackeray group also criticized Congress



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला धारेवर धरले. काँग्रेसची वर्तणूक मान्य आहे का??, असे विचारले. पण तशी विचारणा होईपर्यंत ठाकरे गटाच्या नेत्यांनी सावरकर आणि हेडगेवार यांचा धडा वगळल्याबद्दल भूमिका जाहीर करण्याची तसदी देखील घेतली नव्हती. भाजपच्या नेत्यांनी शरसंधान साधताच काँग्रेसच्या निषेधाची छोटी प्रतिक्रिया पुढे आली.

एरवी शिवसेनेची भूमिका खासदार संजय राऊत टोकाच्या भाषेत व्यक्त करतात. पण सावरकर आणि हेडगेवार यांचा धडा वगळण्याच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी शिवसेनेने मनीषा कायंदे यांना काँग्रेसचा निषेध करण्यासाठी पुढे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर शिवसेनेसाठी नेहमीच आदर्श राहिले आहेत. ते आमचे दैवत आहेत. त्यांचा धडा वगळल्याबद्दल आम्ही काँग्रेसचा निषेध करतो तसेच हेडगेवार यांचाही धडा वगळल्याचा निषेध करतो, असे वक्तव्य मनीषा कायंदे यांनी केले.

Savarkar-Hedgewar Lessons Dropped by Karnataka Govt.; After BJP dropped its criticism, Thackeray group also criticized Congress

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात