संजय राऊत यांचे शिवसैनिकांना धडे, माज- मस्ती पाहिजे, मवाली-गुंड म्हटले तरी चालेल

विशेष प्रतिनिधी

नगर : राजकारणात कार्यकर्त्यांनी सभ्यता पाळावी. आपली प्रतिमा चांगली ठेवावी असे आवाहंन सर्वच राजकीय पक्षांचे नेते करत असतात. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना वेगळेच धडे दिले आहे. शिवसेनेत आहे म्हणजे माज, मस्ती पाहिजेच. मग कोणी माजोरडा म्हणो, गुंड म्हणो किंवा मवाली असे आवाहन त्यांनी केले आहे.Sanjay Raut’s lesson to Shiv Sainiks , dont scare even if it is called Gunda

नगर येथील एका कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना म्हणजे पॉवर, सत्ता. नरेंद्र मोदीसुद्धा समोरुन जाताना माझी विचारपूस करतात. वाघासारखं जन्माला आलो, वाघासारखं मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या.



मला कितीतरी जण म्हणतात की हा गुंड आहे मवाली आहे, असे सांगून राऊत म्हणाले, बाळासाहेब पण म्हणायचे आमची मवाल्यांची संघटना आहे. आम्ही मवाली होतो म्हणून महाराष्ट्र टिकला, आम्ही मवाली होतो म्हणून १९९२ साली हिंदुंचं रक्षण झाले. सत्ता हा मानसिक आधार असतो.

मी समोरुन जात असताना मोदी थांबून म्हणतात कैसे हो भाई? याला म्हणतात सत्ता, पॉवर. सुरुवातीच्या काळात आम्ही हातात मार्मिक ठेवायचो. मार्मिक दिसला की लोक समजायचे पॉवर आहे, शिवसैनिक आहे, मग बसायला जागा मिळायची.

कारण त्यांना कळायचं की हा शिवसैनिक आहे. मग गुजराती लोकदेखील सामना पेपर सोबत ठेवायला लागले. ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, तेही संरक्षणासाठी सामना सोबत ठेवायला लागले. शिवसेना हे सगळ्यांचं प्रोटेक्शन आहे.

Sanjay Raut’s lesson to Shiv Sainiks , dont scare even if it is called Gunda

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात