प्रतिनिधी
मुंबई : हसन मुश्रीफ, सदानंद कदम यांच्याविरोधात ईडीने कायदेशीर कारवाई केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आणखी एक प्रकरण समोर आणले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.Sanjay Raut targets MLA rahul kul over his alleged 500 cr money laundering, but before appearing in front of privilege committee headed by him
हक्कभंग समिती समोर जाण्यापूर्वी आरोप
मात्र या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी ज्या आमदार राहुल कुल यांच्यावर केला आहे, तेच आमदार राहुल कुल हे संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेने आणलेल्या हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. या समिती समोर चौकशीला जाण्यापूर्वी संजय राऊत यांना राहुल कुल यांच्या कारखान्यातील 500 कोटींचा घोटाळा “आढळला” आहे!! संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटले होते. त्यांच्या चोरमंडळ या शब्दावर आक्षेप घेऊन विधानसभेने त्यांच्याविरुद्ध हक्कभंग ठरावा आणला आहे. या हक्कभंग ठराव समितीचे अध्यक्षपद राहुल कुल यांच्याकडे आहे. याच समिती समोर संजय राऊत यांना जबाब देण्यासाठी जायचे आहे. पण हा जबाब देण्याला समिती समोर जाण्यापूर्वीच संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्या कारखान्यातले 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे कथित प्रकरण बाहेर काढले आहे.
भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. भीमा सहकारी साखर कारखाना हा पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आहे. राऊत यांनी यासंदर्भात फडणवीस यांना भले मोठे पत्र लिहिले आहे. हा भ्रष्टाचार नेमका कसा झाला, याचा घटनाक्रमही त्यांनी पत्रात लिहिला आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
राऊतांनी कोणते आरोप केले आहेत?
पुण्यातील दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. कारखान्यात 500 कोटी रुपयांचे मनी लाॅंडरींग झाले आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार त्यापेक्षाही भयंकर आहे. या भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळत असेल तर मी गंभीर आहे, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.
राऊतांचा सोमय्याांना सवाल
विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे किरीट सोमय्या भाजपातील भ्रष्टाचारविरोधात का मूग गिळून बसलेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. जनतेच्या पैशांची लूटमार या कारखान्यात झाली आहे. हे प्रकरण तत्काळ ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App