शिवसेनेची दुहेरी रणनीती : संजय राऊत बाहेर नरमले; तर उद्धव ठाकरे मातोश्रीत गरमले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : संजय राऊत यांच्या सुटकेनंतर शिवसेनेने आता दुहेरी रणनीती स्वीकारल्याचे दिसत आहे. एकीकडे पत्रकारांना बाईट देताना संजय राऊत यांनी आपला सूर बदलल्याचे दाखवून दिले. त्यांनी नरमाईची भूमिका घेत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे मातोश्रीवर जाण्यापूर्वी सांगितले. Sanjay Raut softened out; Uddhav Thackeray warmed to Matoshree

परंतु, संजय राऊत मातोश्रीवर गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मात्र संजय राऊत यांची नरमाईची भूमिका बदलून गरमार्ईचीच भूमिका कायम ठेवली. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या सुटकेवर आनंद व्यक्त करतानाच केंद्र सरकारवर निशाणा साधला. इतकेच नाही तर न्यायव्यवस्था आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला.


Sanjay Raut : राज ठाकरे पुन्हा म्हणाले, “लवंडे”; फडणवीस म्हणाले, “बिनकामाचे”!!


यासाठी त्यांनी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकार छळत असल्याचे सांगितले तसेच केंद्रीय कायदेमंत्री किरण यांच्या वक्तव्याचा हवाला दिला. किरण रिजिजू गेल्या काही दिवसांमध्ये जी वक्तव्ये करत आहेत ते पाहिले तर केंद्र सरकार न्यायव्यवस्थेला देखील आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटते, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

संजय राऊत हे लढणारे शिवसैनिक आहेत. ते जरी फडणवीस, मोदी आणि शाह यांना भेटणार असे म्हणत असले तरी त्यांना भेटायचे असते आणि लढायचे नसते तर त्यांनी आधीच भेटून मांडवली केली असती, असे उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या समोरच म्हणाले.

 शिंदे गटाचा अनुल्लेख

यातूनच शिवसेनेची दुहेरी रणनीती समोर आली आहे. संजय राऊत यांनी एकीकडे नरमाईची भूमिका घेऊन पंतप्रधान मोदी अमित शाह आणि फडणवीसांना भेटायची भाषा करायची आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर मुजोर असल्याचा आरोप करायचा. इतकेच नाही, तर न्याय यंत्रणेला बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करायचा आरोप करायचा. हीच ती शिवसेनेची दुहेरी रणनीती आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी फक्त फडणवीसांना भेटणार असल्याचा उल्लेख करायचा आणि शिवसेनेत गट बीट काही नाहीत. शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे, असे वक्तव्य करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला अनुल्लेखाने मारायचे ही शिवसेनेची दुहेरी रणनीती दिसत आहे.

Sanjay Raut softened out; Uddhav Thackeray warmed to Matoshree

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात