प्रतिनिधी
मुंबई : १९७५ नंतर आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांनी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणले होते. पण दुर्दैवाने आज तसे नेतृत्व देशात नाही, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.sanjay raut says, no leadership in the country today like jai prakash narayan to unite whole opposition parties
एकीकडे संजय राऊत हे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या “राष्ट्रीय” नेतृत्वाची भलामण करून त्यांना यूपीए चेअरमन करण्याचा सल्ला देतात आणि दुसरीकडे देशात विरोधकांना एकत्र आणणारे जयप्रकाशांसारखे नेतृत्व नाही, असेही म्हणतात, यातल्या राजकीय विसंगतीवर नेटकऱ्यांनी सोशल मीडियातून बोट ठेवले आहे.
देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची हाक यावेळी संजय राऊतांनी दिली आहे. ते म्हणाले, की सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करून एका नव्या राजकीय व्यवस्थेविषयी विचारविनिमय करायला हवा.
१९७५ मध्ये जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणले होते. पण दुर्दैवाने आज तसं नेतृत्व देशात नाही. राऊतांच्या याच विधानामुळे राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्राने देशाला एक नवा राजकीय मार्ग दाखवल्याचा दावा राऊत यांनी केला. ते महाराष्ट्राने देशातल्या भाजपविरोधी पक्षांना एक नवा मार्ग दाखवला आहे. विचारसरणी वेगळी असून देखील तीन वेगवेगळ्या पक्षांनी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात आदर्श सरकार चालवले आहे,”
असे संजय राऊत म्हणाले आहेत. यूपीएने हा प्रयोग देश पातळीवर राबवायला हवा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील देशातल्या २७ विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये याचा उल्लेख केला आहे, अशी पुस्ती देखील राऊतांनी जोडली आहे.
शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदावरून संजय राऊतांना हटविल्यानंतरही त्यांची सल्लागारी सुरूच असल्याचे दिसत आहे. शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नसताना देखील त्यांनी शरद पवारांना यूपीए चेअरमन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यावरून काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी राऊतांना शिवसेना नेतृत्वाने मुख्य प्रवक्तेपदावरून हटवून खासदार अरविंद सावंत यांना मुख्य प्रवक्ता नेमले. त्यानंतर राऊत एकच दिवस गप्प बसले पण आज बोललेच, तेही यूपीएबद्दलच.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App