ठाकरे सरकारने सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत एकीकडे या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर भाजपकडून टीकेची झोड उठवणे सुरू आहे. यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.Sanjay Raut is upset over Fadnavis allegations about wine, criticizes MLA Gopichand Padalkar
प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे सरकारने सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत एकीकडे या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर भाजपकडून टीकेची झोड उठवणे सुरू आहे. यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
पडळकर म्हणाले की, जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भीतीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट‘ झालं आहे. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले.
गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला.पडळकर पुढे म्हणाले की, जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार?
परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही. शरद पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरुण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App