संजय राऊत 4 दिवसांच्या ईडी कोठडीत; उद्धव ठाकरे राऊतांच्या घरी!!


वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ईडी कोर्टाने 4 दिवसांची कोठडी दिली आहे. 4 ऑगस्टपर्यंत त्यांना कोठडीत राहून 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात चौकशीला सामोरे जावे लागेल. त्यानंतर पुन्हा त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन कोर्ट पुढचा निर्णय देईल. Sanjay Raut in ED custody for 4 days

 ईडीने मागितली 8 दिवसांची कोठडी

संजय राऊत यांना आज सकाळी जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेऊन नंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ईडी कोर्टात पेश केले. ईडीच्या वकिलांनी संजय राऊत यांच्यासाठी 8 दिवसांचे कोठडी मागितली संजय राऊत यांच्यावर पत्राचा घोटाळ्यातील पैसा वळवून तो जमीन खरेदीसाठी वापरल्याचा आरोप ईडीने ठेवला. मात्र, संजय राऊत यांच्या वकिलांनी त्या आरोप फेटाळून राजकीय सूडबुद्धीने राऊतांवर कारवाई केल्यास आरोप केला. ईडीच्या कोठडीत संजय राऊत यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून ईडीला हवे तसे पुरावे गोळा करण्यासाठी 8 दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याचा युक्तिवाद राऊत यांच्या वकिलांनी केला. कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे. संजय राऊत यांना 31 ऑगस्ट रोजी रात्री 12.40 मिनिटांनी अटक दाखवली होती. त्यामुळे राऊत यांना एकूण 5 दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर पुन्हा कोर्टात सुनावणी होऊन पुढचा निर्णय येणे अपेक्षित आहे.

चौकशीतून बाहेर काय येणार?

दरम्यानच्या 4 दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी संजय राऊत यांची कशी चौकशी करतात आणि ते त्या चौकशीला कसा प्रतिसाद देतात? त्याचबरोबर पत्राचा घोटाळा प्रकरणात तसेच अन्य कुठल्या प्रकरणांमध्ये काय तपशील बाहेर येतात? यावर संजय राऊत यांचा मुक्काम वाढणार की कमी होणार हे अवलंबून असणार आहे.

 उद्धव ठाकरे राऊत यांच्या घरी

एकीकडे संजय राऊत यांना ईडीचे अधिकारी जे जे हॉस्पिटलमध्ये आणि नंतर ईडीच्या कोर्टात नेत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी पोहोचले होते. तेथे जाऊन त्यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, संजय राऊत यांची आई आणि मुलगी यांची भेट घेऊन शिवसेना पक्ष संजय राऊत यांच्या पाठीशी आणि कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कम असल्याचे आश्वासन दिले. संजय राऊत यांच्या आईने उद्धव ठाकरे आपल्या घरी आल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Sanjay Raut in ED custody for 4 days

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात