शिवसेनेला खिंडार : संजय राऊतांना शिवसेनेला संपवल्याचा आनंद; नारायण राणेंचे शरसंधान


प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असताना, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. Sanjay Raut happy to end Shiv Sena Narayan Rane target

संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने, असे नारायण राणे यांनी ट्विट म्हटले आहे.

राज्यातील सत्ता संघर्षाच्या खेळात आता मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राणेंच्या टीकेला आता राऊत काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे.

– छगन भुजबळ यांचे सूचक विधान

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपल्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हटले की, या सर्व घडामोडींवर शरद पवार साहेब लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ यांना घेऊन गेले.

शिवसेनेची अस्वस्थता त्यांच्या बंडखोर आमदारांनी बोलून दाखवली आहे. याआधी आमच्या कानावर असे काही आले नव्हते? तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकार पडणे, राजिनामा देणे वेगैरे आम्हाला नवीन नाही. राष्ट्रवादी कधीही निवडणुकांसाठी तयार आहे. असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहेत.

Sanjay Raut happy to end Shiv Sena Narayan Rane target

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”